वसईतील एवर शाईन सिटी येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 11 जणांच्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. दरोडा टाकण्यासाठी आणलेले इतर साहित्य असा 1 लाख 77 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या अकरापैकी आठ आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात पालघर,मुंबई आणि ठाणे येथील विविध पोलीस ठाण्यात 13 गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे.