घरगुती वादातून महिलेची हत्त्या झाल्याची घटना डांबी (ता. परळी) येथे घडली आहे. हत्या करुन आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शोभा तुकाराम मुंडे (वय ३५ वर्ष) रा. डांबी (ता. परळी) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेचे घरगुती वाद सुरू होते. हा वाद रात्री टोकाला गेला आणि या महिलेची हत्या करण्यात आली. महिला मृत झाल्याचे लक्षात येताच आरोपींने घटनास्थळावरून पळ काढला आहे.