साळगाव लुभाटवाडी येथील एका विहिरीमध्ये मादी बिबट्याचा पडून आज शनिवार 30 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस व वन विभाग यांना कळविले. मात्र रात्री विहिरीत पडलेल्या बिबट्या सकाळी 11 पर्यंत जिवंत होता. पण कित्येक तास पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बिबटयाचा पाण्यात दुदैर्वी मृत्यू झाला. अखेर सुमारे सात तासाच्या अथक मोहिमेनंतर पोलीस, वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांनी सायंकाळी 6 वाजता मृत बिबट्याला गळाने बाहेर काढले.