भंडारा शहरामध्ये असलेल्या आदिशक्ती श्री शीतला माता मंदिराला आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी देवीला चांदीचा मुकुट अर्पण करून महाआरती केली. महाआरतीनंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आमदार भोंडेकर यांच्या उपस्थितीमुळे महाआरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भंडारा येथील आदिशक्ती श्री शीतला माता मंदिर परिसरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.