करडखेडवाडी शिवारातील एका शेतामध्ये गांजा असल्याची गोपनीय माहिती देगलूर पोलिसांना मिळाले असता त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार दि. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2:45 च्या सुमारास करडखेडवाडी शिवारातील बालाजी रूक्माजी कोंकेवाड यांच्या शेतात जाऊन छापामार कारवाई केली असता त्या ठिकाणी गांजाची 95 झाडे वजन 14 किलो किंमत 2,83,000 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपी विरुद्ध देगलूर पोलिसात गुन्हा नोंद केले आहेत, अशी माहिती आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.