राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाने काढलेल्या शासन निर्णयाची (जीआर) तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पूनम गेटसमोर गुरुवारी दुपारी 12 वाजता धरणे आंदोलन सुरू केले. वेतनमान, सेवासुरक्षा आणि इतर सुविधा लागू करण्याच्या मागणीवर कर्मचाऱ्यांचा ठाम पवित्रा घेतला. शासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.