महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक महायुती सोबत लढणार आहे, मात्र मिरजेतील प्रभाग क्र 5, 7 आणि 20 वर आमचा दावा असून या जाग्या आम्हाला देण्यात याव्यात अशी मागणी महायुतीकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र राहुल शंके यांनी मिरजेत दिली आहे. मिरजेतील वृत्तपत्रविक्रेता भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल शंके हे बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे, सोलापूर जिल्हा