गणपती विसर्जनानंतर नदीकाठावर वाहून आलेल्या गणेश मूर्तींचे गेली दोन दिवस मुरगुड येथील शिवभक्तांनी नदीत खोलवर जाऊन पुनर्विसर्जन केल्याची समाजासाठी प्रेरणादायी घटना ठरली.कुरणी घाट आणि दत्त मंदिर घाट या दोन्ही ठिकाणी आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या या उपक्रमात तब्बल २५ हून अधिक सार्वजनिक मंडळांच्या व ५०० हून अधिक घरगुती मूर्तींचा समावेश होता.शिवभक्तांनी प्रथम सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती खोल पाण्यात नेऊन विसर्जित केल्या.