वर्धा मनेरी तालुका आर्वी पोलीस स्टेशन तळेगाव श्यामजीपंत हद्दीत येणाऱ्या अवधूत महाराज मंदिरात 177 वर्षांपूर्वीपासून झेंडा फडकवण्याची परंपरा आजही कायम आहे विजयादशमीच्या दिवशी 51 फूट झेंडा चढविला जातो अनेक लहान-मोठे आजार तसेच नवस पूर्ण होतात आज दुपारी चार वाजल्यापासून विविध जिल्ह्यातील भाविक भक्तांनी या मंदिरात व आदिशक्तीच्या मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती रमेशराव मेहेरे हे दोरखंडाच्या साह्याने जुनी खोळ काढत वर चढतात आणि नवीन टाकत खाली येतात हा अतिशय चित्त थरारक क्षण असतो