तुमसर शहरातील रेल्वे टाऊन परिसरात दि. 19 ऑगस्ट रोज मंगळवारला रात्री 10 वाजता च्या सुमारास तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोयाम यांनी पेट्रोलिंग दरम्यान अमली पदार्थाचे सेवन करणारे आरोपी अंकित गजभिये व दीपांसू बघेले यांना ताब्यात घेत आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा अन्वये तुमसर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.