कळंब तालुक्यातील खोंदला येथील मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेला शेतकऱ्याचा मृतदेह बीड जिल्ह्यात सापडला आहे.शेतकरी सुब्राव लांडगे मांजरा नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना दहा दिवसापुर्वी घडली होती. केज मधील लाखा गावच्या शिवारात त्यांचा मृतदेह दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या दरम्यान आढळला आहे. नदीकाठच्या सोयाबीनच्या शेतात पुराच्या पाण्यात वाहून गेला होता मृतदेह.