सातपूर भागातील भाजी मार्केट पुलाजवळ झाडाला गळफास घेऊन सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 29 ऑगस्ट रोजी घडली असून सकाळी आठ वाजता सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 30 ऑगस्ट रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर अरुण धनगर वय 17 राहणार महादेव वाडी सातपूर याने भाजी मार्केट पुलालगत असलेल्या चेरीच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नसून पोलीस हवलदार बेंडकुळे याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.