आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील पाळा येथे एका युवकांनी आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 25 ऑगस्टला सकाळी सहा ते सात वाजताचे दरम्यान उघडकीस आली आहे. घटनेची माहिती शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून, घटनास्थळ पंचनामा कार्यवाही केल्यानंतर मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे