“माझं सोलापूर – स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर” या मोहिमेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, सह. आयुक्त शशिकांत भोसले, सह. आयुक्त मनीषा मगर, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, विभागीय अधिकारी उपस्थिती होते. कोनापुरे चाळ, मोदी, लष्कर,नळ बाजार, लोधी गल्ली ,सिद्धार्थ चौक,पाथरूड चौक,अशोक चौक, बापूजी नगर अशा परिसरांना भेट दिली.