नदी, ओढ्यांना पूर आल्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बाधित झाले, ज्या ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, अशा ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्य विषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात याव्यात. पुरानंतर येणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने पूरग्रस्त भागात शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले दिल्या.