लातूर -लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या वतीने शहरातील औसा रोडवर असलेल्या थोरमोठे मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय मेळावा आज उत्साहात संपन्न झाला तर या मेळाव्यास ऑल इंडिया मंडप लाईट केटरिंग फेडरेशन चे चेअरमनरामकिशन (दडुसेठ) पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती तर मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या राज्य कार्यकारणीचे चेअरमन सागरभाई प्रल्हाद चव्हाण यांचीही उपस्थिती होती. अशी माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली.