सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि ईद देखील एक दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळामध्ये परिसरात शांतता राहावी आणि सण उत्सव आनंदात साजरे करता यावेत यासाठी बाजारपेठ पोलीस सज्ज झाले आहेत. परिसरामध्ये रूटमार्च करून नागरिकांनी शांततेत सण-उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे. जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे. तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.