वडनेर दुमाला येथे धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भूलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला रीस्क्यू केले आहे.आठवडाभरापूर्वी वडनेर दुमाला येथील चार वर्षीय बालक आयुष भगत याला बिबट्याने ओढून नेल्याची घटना घडली होती.त्यानंतर आयुषचा मृतदेह शेतात सापडल्याने संपूर्ण नाशिकरोड भागात हळहळ व्यक्त केली गेली. आज बिबट्याला रिस्क्यू करण्यात आले आहे.