व्यंकटेश नगर गंगाखेड इथे घरामध्ये रात्री दोनच्या सुमारास पाच महिन्याच्या बाळापाशी कॉटवर जाऊन बसलेला तस्कर साप उंदीरची शिकार करून कपाटा मागे जाऊन बसला. घरातील सर्व सदस्य भयभीत होऊन त्यांची अक्षरशा तारांबळ उडाली. घरातील सदस्यांनी बाळाला सापा पासून सुखरूप बाजूला केली. घरातील सदस्यांनी सर्पमित्र राजे यांना रात्री दोनच्या सुमारास भ्रमणधरीदारी सदरील घटना सांगितली. सर्पमित्र राजे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदरील सापास रेस्क्यू करून घरातील नागरिकांना भयमुक्त केली.