बुलढाणा तालुक्यातील अटकळ येथील दत्तात्राय लक्ष्मणराव खोंडे यांच्या गोठ्याला २४ ऑगस्ट रोजी रात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत त्यांचे दोन बैल आणि गोठा जळून खाक झाला. पोळ्याच्या दोन दिवसांनीच अतिशय चांगली बैलजोडी आगीत भस्मसात झाल्याने त्यांचे भयंकर नुकसान झाले आहे. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ठाकरे गट शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली.