मोठे ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी कर्जाची गरज असल्याने सौ.हेमलता प्रेमसिंग रघुवंशी (वय ४०) या महिलेस दोन आरोपींनी तब्बल दोन कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून त्यांची २१ लाखाची फसवणूक केल्याची घटना दिनांक २३ सप्टेंबर रोजी सायं ५:३० वाजता उघडकीस आली याबाबत महिलेने चिखलदरा पोलीसात तक्रार दाखल केली.फिर्यादी यांना मोठे ब्युटी पार्लर टाकण्यासाठी कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी सौ. दिपाली दिपक सिंग चव्हाण व अल्लाउद्दीन जमीरोद्दीन या आरोपींना विचारणा केली.