औसा - स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजाला न्याय देण्यासाठी महायुती सरकारने तर अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत पण यासोबतच औसा मतदारसंघात भटक्या विमुक्तांचे एक सर्वेक्षण केले जाणार असून या सर्वेक्षणानुसार त्या कुटुंबाना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून दिले जाणार आहेत. या समाजाच्या वस्तीमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक आराखडा तयार करून येणाऱ्या काळात त्यावर काम केले.