आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे मनपा क्षेत्रातील प्रभाग रचनेबाबत हरकती नोंदवण्यासाठी आज ठाणे मनपामध्ये सर्वपक्षीय नेते आले होते.यावेळी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रभाग रचना संदर्भात जर आवश्यकता सूचनांवर कारवाई करावी अन्यथा ठाण्यात मोठे जनआंदोलन उभारू असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. तुम्हाला विरोध करणारे बाप ठाण्यात आहेत हे सत्ताधाऱ्यांना दाखवल्या शिवाय राहणार नाहीत असेही अविनाश जाधव म्हणाले.