महागाव तालुक्यातील काळी दौलत गावात बैल पोळा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतकऱ्यांचे जिवाभावाचे सोबती ठरणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा सण साजरा केला जातो. आज शुक्रवार दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान काळी दौ येथील सामकी माता मंदिर परिसरात शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांची रंगीत सजावट करून मिरवणुकीत आणले. ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक वेशभूषेत शेतकऱ्यांनी बैलांची पूजा केली. यावेळी गावातील महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते