पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत स्ट्रिट सेफ्टी पथक आणि शहरातील सर्व पोलीस स्टेशन यांना भारतीय हत्यार कायदा अन्वये कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने दि २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री २१:४० चे सुमारास राहुल नगर रोडवर यातील आरोपी आकाश उर्फ टमाट्या कदम वय २१ वर्षे हा मा.उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिलेल्या हद्दपार आदेशाचा भंग करून एक लोखंडी खंजर ताब्यात बाळगलेला पोलीसांना मिळुन आला. याप्रकरणी फिर्यादी पोलिस काॅन्स्टेबल कल्याणकर यां