जालना शहरातील सिंधी बाजार येथे एक धक्कादाय घटना घडली असून या घटनेत गणपती स्थापनेच्या पुर्व संध्येला विद्युत शॉक लागल्याने एकाचा मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी अद्याप कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल झालेला नसून केवळ आकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असल्याची माहिती सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता दिली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.