अंबाजोगाई शहरातील मेडिकल रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वेळोवेळी नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी केली, मात्र तरीदेखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या निष्क्रीय प्रशासनाविरोधात अखेर नागरिक आक्रमक झाले. आज संतप्त नागरिकांनी मेडिकल रोडवरील मोठ्या खड्ड्यांमध्ये बेशरमाच्या झाडांची लागवड करून अनोखा निषेध नोंदविला.