गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या दोन मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता, बंधुता आणि कायदा-सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी दि.23 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता आनंदनगर पोलिसांनी शहरातुन रूट मार्च काढला.हा रूट मार्च आनंदनगर पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन आर. पी. कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, कलेक्टर ऑफिस परिसरातून पार पडला. रूट मार्च दरम्यान पोलिसांनी नागरिकांना सण आनंदात, पण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.