श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान हे सार्वजनिक ट्रस्ट असून पुजारी मंडळींकडून याचा कारभार पहिला जातो.मात्र देवस्थानतर्फे विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू आहे. अनावश्यक गोष्टींसाठी वारेमाप खर्च देवस्थानतर्फे केला जात आहे.याचे गौडबंगाल नेमके काय? या संदर्भात ट्रस्ट समितीला दत्तभक्तांनी जाब विचारला पाहिजे,असे निवेदन देवस्थानचे माजी विश्वस्त मुकुंद वाडीकर-पुजारी यांनी आज शनिवार दिनांक 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषदेत दिले आहे.