तुमसर शहरातील बायपास रस्त्यावर दि.28 ऑगस्ट रोज गुरुवारला पहाटे 4 वाजता च्या सुमारास तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीचंद गंगवानी यांनी पेट्रोलिंग दरम्यान अंधारात लपून बसलेल्या एका संशयीत तरुणाला ताब्यात घेतले. संजय उमराव भोयर रा.हसाराटोली असे आरोपीचे नाव असून तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या बेतात असून अंधारात लपून आढळल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.