तुमसर तालुक्यातील चिखली येथे दि. 22 ऑगस्ट ला फिर्यादी शुभम सुरेश येडमाचे यांच्या 15 कोंबड्या आरोपींनी चोरून नेले. यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरून कोंबड्या चोरी करणारे 4 संशयीत आरोपी खुशाल पेंदाम, जितेंद्र पेंदाम, रितिक गजाम व अमित सयाम यांच्याविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.