मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी मनोज जरांगे पाटील अमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणाला मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा सेवक आनंद काशीद यांनी केले आहे. त्यांनी आज 22 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील तहसील कार्यालयासमोर माध्यमांशी संवाद साधला आहे.