पातुर तालुक्यामधील पिंपळखुटा चांगेफळ येथील "मन" नदीपात्रातून या सकाळी तीन तरुण नदीत पोहण्यासाठी गेले असता यामधील "करण वानखडे" २४ वर्षीय तरुण हा नदीत नदीच्या पाण्यात वाहून गेलाये. दरम्यान दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात मन नदीला पूर आला. "मन" नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेला. गेल्या दोन ते तीन तासापासून अकोल्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने काटेपूर्णाच्या वंदे मातरम पथकाच्या सहकार्याने शोध घेतला जात आहे