आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथे पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पुरस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात एकूण 12 नागरिक अडकले होते. एन. डी. आर. एफ. टीमच्या मदतीने सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी तहसीलदार वैशाली पाटील, देविदास आबा धस, सरपंच संदीप खेडकर, शाम धस, सागर धस, विजय खेडकर, रामा जगताप, विनोद खेडकर, प्रविण झांबरे, यांच्यासह सांगवी आष्टी, हिंगणी गावचे प्रमुख कार्यकर्ते व नागरिकांना मोठया संख्येने उपस्थित होते.