आज दिनांक 11 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने मोर्शी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महसूल सेवक कोतवाल पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात आले. मागणी मंजूर न झाल्यास दिनांक 12 सप्टेंबर पासून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या क्षेत्रामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला