रत्नागिरी : दिनांक12/03/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पावस अंतर्गत उपकेंद्र गाव खडी येथे राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी आयुर्वेद व आयुर्वेद चिकित्सा व उपचाराचे दैनंदिन जीवनातील महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मा.अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे ,तालुका आरोग्य अधिकारी रत्नागिरी डॉ. महेश्वरी सातव,जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिताली मोडक,गावखडी गावचे सरपंच श्री.गौतम पाटील, वैद्यकिय अधिकारी पावस डॉ मनाली चव्हाण तसेच सर्व आरोग्य कर्मचारी,आशा,गट प्रवर्तक, अंगणवाडी ताई व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.