नैसर्गिक आपत्तीत विजेचे पोल पडल्यानंतर ते उभे करुन वीज पुरवठा सुरु करण्यासाठी अनेक महिने लावले जातात. यामध्ये नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळं पडलेले पोल पुन्हा उभारून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विशिष्ट वेळेचं बंधन घालण्याबाबतचा मुद्दा लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला.