तान्हा पोळा या सणानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीत खेळल्या जाणाऱ्या जुगारावर हुडकेश्वर पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही केली आहे. पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीत महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये पाच कार्यवाही करून एकूण 50 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून व घटनास्थळावरून नगदी एक लाख 13 हजार 900 रुपये दहा मोबाईल 29 दुचाकी असा एकूण 20 लाख 93 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहे