खामगाव तालुक्यातील रोहणा शिवारात रोहिटा आडवा आल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजे दरम्यान उघडकीस आली.रोहणा येथील दत्ता अनंतराव देशमुख वय २५ वर्ष हा त्याच्या दुचाकी क्रमांक (एमएच २८ सीबी ७९५२) खामगाव-बुलढाणा रोडने जात असताना अचानक रोहणा शिवारात रोहिटा आडव आल्याने दुचाकी स्वार युवकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडावर दुचाकी धडकली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.