माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या 3 फिरत्या विसर्जन रथाचे आज दि 28 आगस्ट ला 12 वाजता आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते फीत कापुन उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिद्रवार,मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी,सहायक आयुक्त अनिलकुमार घुले,डॉ.नयना उत्तरवार,डॉ.अमोल शेळके, उपअभियंता रवींद्र कळंबे,उपअभियंता प्रगती भुरे,चैतन्य चोरे व मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.