मुंबईहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या कारची अज्ञात वाहनाशी धडक होत अपघातात पाच जण जखमी झाले.हा अपघात शनिवारी तारीख 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते अडीच वाजेच्या दरम्यान घडला. राजू चव्हाण वय 38 वर्षे,मधुकर सोनवणे वय 32 वर्षे,संजू बगाले वय 31,एकनाथ राठोड वय 37,एकनाथ काटकर वय 40 हे प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले आहे.