खांडवी येथे केबल चोरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात 29 ऑगस्ट दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहिती वरून खांडवी येथील सोलार प्लांटवर चोरी झाल्याची घटना घडली होती. परतूर पोलिसांनी खांडवी येथील सोलर प्लांटवरील चोरीचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. समीर काळे, सय्यद असेफ आणि शेख गौस या तिघांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ४० हजार रुपयांचे तांब्याचे सोलर केबल जप्त केले असून, पुढील तपास परतूर पोलीस करत आहेत.