शेगाव शहरात ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन जुलूस मोहम्मद अली चौकातून आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान काढण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांचा सहभाग होता.निघालेल्या जुलूसाची विशेष बाब अशी होती की मार्गात जिथे जिथे गणेशोत्सवाचे मंडप आले, त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी स्वतःहून माईक व साऊंड सिस्टम बंद करण्यात आली होती.