पालकमंत्री श्री. रावल यांनी शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव, वसमाने व तापी परिसरातील गावांना भेट देऊन नुकसान झालेल्या विविध पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.