वरोरा तालुक्यातील शेगाव परिसरात आज दि 12 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजता झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यातील अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, मुधोली, चारगाव सावरी, माकोना, भटाळा, कोटबाळा, टेंभुर्डा, कोसळसार, चेक कवडापूर कडे वाहतूक करणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या वरून पाणी असल्यामुळे वरोरा शेगाव, चिमूर ग्रामीण भागातून जाणाऱ्या नागरिकांचा मार्ग बंद झाला असून परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.