कुंभोज परिसरात गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईंचे उत्साही स्वागत करण्यात आले.गावभर भक्तीमय आणि आनंददायी वातावरण पसरले असून,प्रत्येक घरात गौराईंची स्थापना मोठ्या श्रद्धेने पार पडत आहे.सकाळपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गौराईंचे स्वागत केले. घरोघरी चविष्ट फराळ,नवसाचे नैवेद्य आणि विविध पारंपरिक पाककृती तयार करण्यात आल्या.गौराईंच्या स्वागतासाठी झिम्मा-फुगडीसह पारंपरिक गीतांचे आयोजन करण्यात आले.