कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात नायगाव येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या ग्रामसभेत रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची नावे व मजुरीच्या वाटपाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला. चर्चेच्या दरम्यान अचानक वाद वाढताच एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. या हाणामारीची फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात चांगली चर्चा रंगली आहे. कोरेगाव पंचायत समिती कार्यालयातून शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या ग्रामसभेत हा प्रकार घडला.