विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दुपारी ४ वाजता दर्यापूर शहरातील गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर नागपूर कराराची होळी करण्यात आली.आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेला नागपूर करार हा विदर्भाच्या शोषणाचे प्रतीक असून,सिंचन,उद्योग,वीज,शिक्षण व रोजगार या सर्वच क्षेत्रांत विदर्भाला न्याय नाकारला गेला आहे.याच निषेधार्थ आंदोलनाचे स्वरूप उभारण्यात आले आहे.या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील साबळे,अमोल कंठाळे,अशोक पाटील राणे उपस्थित होते.