यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी देखील उत्कृष्ट चांगला आणि राज्यात क्रमांक एकचा दर दिला आहे. सर्वसामान्य शेतकरी सभासदांची असलेली बांधिलकी कायम ठेवत एफआरपी पेक्षा १३४ कोटी रुपये जास्त देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांनी दिली. रेठरे बुद्रुक येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी दोन वाजता झाली.