तालुक्यात व शहरात गणपती विसर्जनाला सकाळपासूनच सुरुवात झाली तर दिवसभरच उशिरापर्यंत अनेक ठिकाणी विसर्जन करण्यात आले. वाजत, गाजत, गुलाल उधळत गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करीत अनेक ठिकाणी विविध पाण्याच्या प्रवाहात गणेशाचे विसर्जन करण्यात आले .अनंत चतुर्थीला गणेश विसर्जनाची परंपरा असल्या वरून आज तालुक्यात व शहरात गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आले.